नागपूर विधान परिषद निवडणुकीत डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाचा जल्लोष

नागपूर, मोहन नागेश्वर

नागपूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. राजीवजी पोतदार यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला.
या प्रसंगी आमदार समीर भाऊ मेघे, आमदार आशिषजी देशमुख, आमदार चरणसिंह भाऊ ठाकूर, नागपूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ कुंभारे, माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित नेत्यांनी डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत हा विजय विकास, जनसंपर्क आणि भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयामुळे नागपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!